24 तासात कोरोनाबधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त



यवतमाळ जिल्हयात 180 कोरोनामुक्त, 107 पॉझेटिव्ह


यवतमाळ, दि. 4 जून :  

           जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढत असून  जिल्ह्यात 24 तासात बरे झालेल्या रुग्णांची कोविड बाधितांपेक्षा जास्त आहे. आज 180 जण कोरोनामुक्त  झाले असून 107 जण पॉझेटिव्ह आले  आज  5 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यातील तीन मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन मृत्यू खाजगी रुग्णालयात झाले आहे. 


            जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 4789 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 107 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4682 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 912 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 417 तर गृह विलगीकरणात 495 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72286 झाली आहे. 24 तासात 180 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 69599 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1775 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 40 हजार 131 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 66 हजार 941 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.29 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी  दर 2.23 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.            


          पॉझेटिव्ह आलेल्या 107 जणांमध्ये 85  पुरुष आणि 22 महिला आहेत. यात आर्णी येथील 2, बाभुळगाव येथील 9, दारव्हा येथील 11, दिग्रस येथील 16 , घाटंजी 0, कळंब 3,   महागाव येथील 2,  मारेगाव येथील 1, नेर येथील 3, पांढरकवडा 5, पुसद येथील 13, राळेगाव 1, उमरखेड 9,   वणी येथील 1, यवतमाळ 9, झरीजामणी येथील  23  रुग्ण आहे.  


        मृत्यू झालेल्या 5 व्यक्तींमध्ये 4 व्यक्ती यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यवतमाळ तालुक्यातील 79 वर्षीय पुरुष, तर नेर तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालायतील झरी जामणी तालुक्यातील 55 वर्षीय महिला, तसेच पुसद तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील एक 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.     


जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2010 बेड उपलब्ध:

             जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 269 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2010 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 81 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 496 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 81 रुग्णांसाठी उपयोगात तर  445 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 107 उपयोगात तर 1069 बेड शिल्लक आहेत.         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या