गैरसोय टाळण्यासाठी नोंदणी करावी
यवतमाळ दि. 22:
जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन यवतमाळ जिल्ह्यात लसीकरणाकरीता होणा-या गर्दी तसेच गैरसोय होऊ नये व लसीकरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याचे उद्येशाने नागरीकांना लसीकरण सोयीचे होण्याचे दृष्टीकोणातुन यवतमाळ जिल्ह्याकरीता लसीकरण पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टलची नागरीकांकरीता नोंदणी लिंक https://yavatmal.govvaccine.in/#/ ही असुन जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की सदर लिंकवर नोंदणी केल्यास आपणास आपल्या लसीकरणाचा दिनांक व वेळ एस.एम.एस. च्या माध्यमातुन कळविण्यात येणार आहे तरी सर्व नागरीकांनी सदर नोंदणी लिंकवर माहीती भरावी. जेणे करुन लसीकरणाकरीता गैरसोय होणार नाही. तसेच लसीकरणाचे योग्य नियोजन करता येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.


0 टिप्पण्या