(प्रतिनिधी अवधूत सावंत)
अखिल भारत हिंदू महासभा रायगड जिल्ह्याच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी देखील रोहा येथे क्रांतिकारकांचे महामेरू तथा अखिल भारत हिंदू महासभा या ऐतिहासिक राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद भूषविलेले हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.
रोहे नगरीतील प्रसिद्ध राम मारुती चौकात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी स्वाध्याय परिवाराचे प्रणेते प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले आणि स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अखिल भारत हिंदू महासभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर खामकर, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिलकर, जिल्हा संघटक गणेश पवार, रोहा तालुका अध्यक्ष विलास धामणसे, उत्तम भांड तसेच रोहा तालुक्यातील कट्टर सावरकरप्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व नवनिर्वाचित जिल्हा तथा तालुका पदाधिकाऱ्यांना जिल्हा अध्यक्ष मधुकर खामकर यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.
0 टिप्पण्या