कविता : *आनंदाच्या वाटेवर *


जि. प. पू. प्रा. शाळा सांगुळवाडी नं. 1 चा शाळा पूर्वतयारी विशेष उपक्रम "आनंदाच्या वाटेवर "



   कोरोनाच्या महामारीमुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थी शाळेपासून दूर होत चालले आहेत.यासाठी पुन्हा एकदा सन २०२१-२२ या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पुन्हा शैक्षणिक वातावरणात  घेऊन जाण्यासाठी शाळा सांगुळवाडी नं.1शाळेने विशेष उपक्रमाचे आयोजन केले.मुख्याध्यापक श्री. मिलिंद सर्पे यांच्या संकल्पनेतून सहकारी शिक्षिका श्रीम. स्नेहलता राणे (पदवीधर ), श्री. महादेव शेट्ये (उपशिक्षक ) यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेतून व पालकांच्या सहकार्यातून दि.१ जून २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत विध्यार्थ्यांसाठी "आनंदाच्या वाटेवर "हा विशेष ऑनलाईन उपक्रम राबविला.

      इयत्ता १ली ते ७ वी च्या सर्व विध्यार्थ्यांसाठी दोन गटात इ. १ली ते ४ थी व ५वी ते ७वी अशा दोन गटात स्पर्धात्मक कार्यक्रम घेतला. जास्तीत जास्त उपक्रमात सहभागी होणाऱ्या विध्यार्थ्यांना विशेष पारितोषिकांचे आयोजन केले होते. दहा दिवस रबविलेल्या ह्या उपक्रमांमध्ये विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकांचे ही उत्तम सहकार्य लाभले.

      स्पर्धात्मक कार्यक्रम दि.१ जून २०२१ गायन, दि. २जून २०२१ कथाकथन, दि. ३जून २०२१ कथालेखन, दि. ४ जून २०२१ कथा / कविता वाचन, दि. ५जून २०२१ चित्रकला, दि. ६जून २०२१ कार्यानुभव वस्तू दि. ७ जून २०२१ विशभूषा, दि.८ जून २०२१ निबंध / घोषवाक्य दि. ९जून २०२१ नृत्य स्पर्धा दि. १०जून २०२१ झाडे लावा झाडे जगवा, असे विशेष उपक्रम घेतले.

       दहा दिवसांच्या या उपक्रमामध्ये 30 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. इयत्ता पहिली ते चौथी लहान गटात कु. आयुषी प्रफ़ुल्ल जाधव इयत्ता -तिसरी प्रथम क्रमांक, कु. आयुष विलास जाधव इयत्ता -दुसरी, कु. प्रथम समाधान रावराणे इयत्ता पहिली विभागून द्वितीय कमांक तर इयत्ता पाचवी ते सातवी मोठया गटात कु. सिद्धी समाधान रावराणे इयत्ता-सहावी कु. आर्या धनंजय राणेइयत्ता -पाचवी विभागून प्रथम क्रमांक, कु. शुभम समीर रावराणे इयत्ता -सातवी द्वितीय कमांक मिळवून यश संपादन केले आहे.

        सर्व सहभागी विदयार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र आणि विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या विशेष नावीन्यपूर्ण उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक,  अधिकारी वर्ग यांच्याकडून विशेष कौतुक आणि अभिनंदन होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील. सांगुळवाडी गावचे सुपुत्र प्राथमिक शिक्षक श्री. प्रफ़ुल्ल जाधव सर यांनी विदयार्थ्यांचे विशेष कौतुक करून प्रेरणा दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. मिलिंद सर्पे सरआणि सहकारी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.



*आनंदाच्या वाटेवर *


सांगुळवाडी शाळेत आनंदी आनंद

विद्यार्थी उलघडू लागले आपले छंद


एक जून ला तर स्वरांची कमाल

मुलांनी गाणी गाऊन केली धमाल 


दोन जून तर सर्वांच्या आवडीचा 

कथा सांगण्या ऐकण्या सवडीचा


तीन जून ला तर शाळेची कथा

मुलांनी लिहिली करोनाची व्यथा


चार जून ला भरले साहित्य संमेलन

एकापेक्षा एक साहित्यिक रममाण


पाच जून ला हात सरसावले

चित्रे रंगवून कोरॊनाला हरवले


सहा जून विशेष कारामतीचा

टाकाऊतून टिकाऊ छान छान वस्तूंचा


सात जून विविध वेशभूषा सादरीकरणाचा

जिजामाता ताराबाई सावित्रीच्या लेकींचा


आठ जून ला दिला कोरोनाचा संदेश

घोषवाक्ये निबंध यातून खरा उपदेश


नऊ जून ला नृत्य कला बहारदार

सुंदर अदाकारिनी केला अविष्कार


दहा जून सांगू लागला करू पर्यावरण रक्षण

विद्यार्थी म्हणाले,

 झाडे लावू झाडे जगवू हेच आपले शिक्षण


गुरूंनी दिला प्रेरणेचा कानमंत्र

विदयार्थ्यांनी जोपासले ऑनलाईन तंत्र


शाळा पूर्व तयारी विशेष उपक्रम सादर

आनंदाच्या वाटेवर, आनंदाच्या वाटेवर

 


 
सौ. स्नेहलता राणे

शाळा सांगुळवाडी नं 1 
 मोबा.9421267534

`         ई-मेल sneharane1976@gmail.com


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या