डोंबिवली ( शंकर जाधव ) मुसळधार पावसामुळे े डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ५१ महाराष्ट्र नगर,प्रभाग क्रमांक ५२ देवीचा पाडा,प्रभाग क्रमांक ५६ गावदेवी मंदिर-नवागाव या विभागात नाले सफाई झाली असून सुद्धा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानेे ठिकाठिकाणी नालेे तुडुंब भरल्याने चाळीत पाणी शिरले होते. याची माहिती मिळताच त्वरित मनसे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि माजी नगरसेविका सरोज भोईर ह्यांच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून पाण्याला जाण्याचा योग्य तो निचरा करण्यात आला. यावेळी मनविसे शहर सचिव प्रितेश म्हामूणकर, महाराष्ट्र सैनिक संदिप उर्फ गरुड म्हात्रे , संकेत सावंत, भुषण घाडी, समीर चाळके,विरेश करंदीकर, माजी उपविभाग अध्यक्ष संदिप (रमा) भास्कर म्हात्रे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या