ही असा इटमना!
आधीच जाता जाईना कोरोना
त्यात वादळवाऱ्यांनी केली दैना
"शिरा पडा दे, ही असा इटमना!"
इतक्या म्हणशी नी पुढे सरशी
कोकणी मालवणी माणसा
तू दुःखातही आपला सुख शोधशी
नुकसान होऊनही नाराज नसशी
ना कुणाचा आधार घेशी
ना सरकारी मदत मागशी
ना निसर्ग कोपलो म्हणशी
"शिरा पडा दे, ही असा इटमना!"
इतक्या म्हणशी, नी कामाक लागशी
जीवनात संकटावर संकटे पेलशी
मांडावानी ऊन;पाऊस,वादळ झेलशी
अन तरीही ताट टेचात उभा रव्हशी
आभाळ कवेत घेण्याचा प्रयत्न करशी
"शिरा पडा दे, ही असा इटमना!"
इतक्या म्हणशी, नी कामाक लागशी
कवी हरिसंतोष
संतोष गोपाळ सावंत
8779172824 ✍️



0 टिप्पण्या