चेंबूरच्या गणेश तलावाची साफसफाई करताना आढळले मोठे मासे व कासव

 चेंबूरच्या गणेश तलावाची साफसफाई करताना आढळले मोठे मासे व कासव



मुंबई - चेंबूरच्या घाटले गाव परीसरातील संभाजी नगरात असलेल्या गणेश तलावाची साफसफाई सालाबादप्रमाणे बेस्टचे माजी अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर यांच्यावतीने सुरू आहे. ही सफसफाई करताना मोठमोठे मासे आणि छोटी कासवे आढळून आल्यानंतर गाळात रुतत चाललेल्या या जलप्राण्यांना स्थानिक तरुणांनी पकडून स्वतंत्र टॅंकमध्ये सोडून जीवदान दिले.


दरवर्षीया गणेश तलावाचे गाळ काढण्याचे काम सुरु असताना पाणी कमी झाल्याने हे मासे आणि कासवे दिसू लागताच बघ्यांची गर्दी होऊ लागली होती. त्याचवेळी नगरसेवक पाटणकर यांनीही याठिकाणी भेट दिली . त्यावेळी काही स्थानिक तरुणांनी या जलप्राण्यांना पकडून वेगळ्या बनविलेल्या पाण्याच्या टॅंकमध्ये सोडले. तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि तलावाचे पुनर्भरण झाल्यानंतर हे जलप्राणी त्यात सोडले जाणार आहेत.याकामी स्थानिक तरुण कार्यकर्ते राजेश जाधव ,चित्रा पेडणेकर ,तुषार पाटील , युवा शाखा अधिकारी विनय शेट्ये,किरण पाटील , मोहनिश म्हात्रे,सन्नी सिंग यांचे विशेष सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या