डोंबिवलीत पालिकेचे लसीकरणातभाजपची नियोजनबध्द आखणी....



अभिप्राय नोंदणीतून कौतुक.


डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण -डोंबिवलीत गेल्याचार दिवसाने पुन्हा लसीकरण करण्यास सुरुवात झाली असून डोंबिवली पश्चिम येथील सवित्रिदेवी बसप्पा हेबळी विद्यालयातील लसीकरण केंद्रावर ३२० जणांना लस देण्यात आल्याची माहिती भाजपचे मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस यांनी दिली. अनेक लाभार्थ्यांनी सदर लसीकरण केंद्राच्या नियोजनबध्द कामाचे अभिप्राय नोंदवहीत   कौतुक केले आहे,तर जेष्ठ नागरिकांनी केंद्रातील लसीकरणाच्या  नियोजनबद्ध आखणीबद्दल समाधान व्यक्त केले.

     बुधवारी सकाळी १२.३० वाजता या केंद्रावर महापालिकेकडून लसीचा पुरवठा करण्यात आला. त्यांनतर शिस्तबद्ध पद्धतीने या सेंटरवर लसीकरण करण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. तर अनेक नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या  मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू झाले असून  सरचिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे, मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस, मंडळ उपाध्यक्ष अमोल दामले , दिलीप धुरी,सुरेश जोशी,गीता नवले आदी कार्यकर्ते ही लसीकरणाची मोहीम राबवत आहे.अनेक लाभार्थ्यांनी लस घेतल्यानंतर ताटकळत न ठेवता लसीकरण सेवा उपलब्ध करुन दिल्याने लसीकरण केंद्रबद्दल समाधान व्यक्त केले.लसीकरण नियोजन बध्द होत असल्याने नागरिकांनी अभिप्राय नोंदवही ठेवण्यासाठी आग्रह केला होता.या नोंदवहीत अनेकांनी या केंद्राचे कौतुक केले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेने  खोळंबा होउ न देता लस पुरवठा पुर्ववत केल्याने समीर चिटणीस यांनी महापालिका आयुक्त डॉ.विजय  सुर्यवंशी आणि पालिका अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या