‘बापमाणूस’ या मराठी मालिकेतील अष्टपैलू कलाकार अभिलाषा पाटील यांचं कोरोनाने निधन झालं आहे.

 


‘बापमाणूस’ या मराठी मालिकेतील अष्टपैलू कलाकार अभिलाषा पाटील यांचं कोरोनाने निधन झालं आहे. अभिलाषा पाटील या मराठी मधील एक अष्टपैलू कलाकार होत्या. त्यांनी आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. फक्त मराठी मालिकांमध्येच नव्हे तर मराठी आणि हिंदी चित्रपटात देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका साकारली आहे. मराठीतील लोकप्रिय ठरलेली मालिका ‘बापमाणूस’ मध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट अभिनय केला होता...

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा विळखा वाढला आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व शुटींग बंद करण्यात आल्या आहेत. आणि म्हणूच कलाकार शुटींग साठी परराज्यात गेले आहेत. त्याप्रमाणेच अभिलाषा सुद्धा शुटींगच्या निमित्ताने बनारसला गेल्या होत्या. मात्र तिथे त्यांची प्रकृती बिघडली होती. म्हणून त्यांनी परत मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये येऊन त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. आणि त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यांनतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या चार दिवस ICU मध्ये सुद्धा होत्या. मात्र अखेर त्यांचा कोरोनाशी लढा अपयशी ठरला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या