महिलांच्या डब्यात शिरून मोबाईल हिसकावून पसार..

 महिलांच्या डब्यात शिरून मोबाईल हिसकावून पसार..

      आंबिवली रेल्वे स्थानकातील घटना   


 डोंबिवली ( शंकर जाधव ) महिलांच्या सुरक्षिततेकरता रेल्वे प्रशासनाने योग्य पाउले उचलणे आवश्यक आहे.महिलांच्या डब्यात पोलीस कर्त्यव्यावर असल्यास चोरीचे प्रकार होत नाही.परंतु महिलांच्या डब्यात पोलीस नसल्याने याचा फायदा चोरटे घेत आहे.लोकल फलाटावर आल्यावर महिलांच्या डब्यात शिरून महिलेच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून चालू गाडीतून उतरून पसार झाल्याची घटना आंबिवली रेल्वे स्थानकात बुधवारी  १० तारखेला सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली.कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


   मिळालेल्या माहितीनुसार,ठाणे येथील वैशाली नारायण घरत ( २१ ) या १० तारखेला सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आसनगाव ते कल्याण असा अप सीएसटी लोकल गाडीचे गार्ड बाजूकडील दुसरे वर्गाचे महिलांच्या डब्यातून बसून प्रवास करत होत्या. लोकल आंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्र.०२ वर सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास थांबली असताना अनोळखी इसमाने सदर डब्यात चढला.त्याने फिर्यादीच्या डाव्या हातातील १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन खेचून चालू लोकल गाडीतून फलाटावर उतरून पसार झाला.या घटनेमुळे महिलाच्या डब्यात पोलीस कर्त्यव्यावर असावे अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या