आचार्य भिसे गुरुजी प्राथमिक विद्यालयात तीन दिवसात ९०० ज्येष्ठ नागरिकांना लस
डोंबिवली ( शंकर जाधव ) आचार्य भिसे गुरुजी प्राथमिक विधालय पाथर्ली डोंबिवली ( पूर्व) येथे पालिका महापालिकेच्या माध्यमातून व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी प्रभाग क्र. ७४ पाथर्ली गावठाण येथे भाजप डोंबिवली शहर उपाध्यक्ष अनिलभाई ठक्कर यांच्या प्रयत्नाने कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली.गेल्या तीन दिवसात ९०० ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली. माजी नगरसेवक राजन आभाळे, भाजप उत्तर भारतीय मोर्चा महिला अध्यक्षा सुरेखा पांडे,दमयंती भानुशाली,पंढरीनाथ म्हात्रे,आदिसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या तीन दिवसात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद मिळाला.विशेष म्हणजे या तीन दिवसात ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून त्या ज्येष्ठ नागरिकांनी कोणताही त्रास झाला नाही.परंतु ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर नोंद करण्यासाठी त्रुटीमुळे येत होत्या.त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सदर केंद्रात गर्दी झाली होती. माजी नगरसेवक म्हात्रे यांनी ऑफलाईन पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांची नोंद करून शासनाच्या संकेतस्थळावर संथगतीने सुरु झाल्यावर ऑनलाईन पद्धतीने नोंद करून घेतली.दरम्यान डोंबिवलीतील अनेक केंद्रात जेष्ठ नागरिक आधार कार्ड घेऊन लस टोचण्यासाठी येत असतात.परंतु संकेतस्थळावर नावनोंदणी करत नाही.म्हणून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.नावनोंदणीसाठी हेल्पलाईन सुरु करावी अशी मागणी माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी केली आहे.यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांचेही सदर केंद्रात लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य केले.
0 टिप्पण्या