स्वर्गीय. सौ. मिताली मनिष गावडे यांना खर्डीकर कलासेसची एक अनोखी भावपुर्ण श्रध्दांजली
मरावे परी कीर्ती रूपे उरावे
काही माणसे अशी जन्माला येतात आणि काही कर्तबगारी करून जातात व त्या अजरामर राहतात. ती माणसे आपल्यात आता जरी नसली तरी त्यांनी केलेल्या समाजोपयोगी कामांची नेहमीच आठवणी येत राहतात. त्यामुळे देहाने नसल्या तरी ते आपल्यातच आहेत असे भास होत असतात. सामान्य माणसाच्या सानिध्यात राहूनही असामान्य अशी कामगिरी ते कमी वयातच करून दाखवितात. इतरांची मने जिंकून समाजाला एक आदर्श घालून देतात हाच त्यांचा तो मोठेपणा असतो.
आम्ही आज ज्या महिलेबद्धल बोलत आहोंत, त्यांची आपणास ओळख करून देणार आहोत. त्या म्हणजे स्वर्गीय. सौ. मिताली मनिष गावडे ह्या होय. यांचा जन्म मुळात कोकणात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात.
माहेरचे नाव शुभांगी शंकर चव्हाण हे होते. बालपण तसे त्यांचे डोंबिवलीतच गेले. लग्नानंतरही त्या डोंबिवलीत राहून आपल्या पती व मुलांना संभाळत आपला संसार संभाळत होत्या, त्यात त्या सामाजिक कार्यातही अग्रेसर होत्या.
याचीच दखल घेऊन नवचैतन्य सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी, पत्रकार, संपादक संतोष सावंत आणि संस्थेचे सल्लागार डॉ. सुनील खर्डीकरसर व संस्थेचे पदाधिकारी यांच्या मार्फत माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांना आदर्श समाजरत्न २०२० चा पुरस्कार २४ जानेवारी २०२१ रोजी देण्यात आला होता.
स्वर्गीय सौ.मिताली मनीष गावडे यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी अगदी अल्पशा आजाराने त्यांचे २१ फेब्रुवारी २०२१ रोजी निधन झाले
दोन दशके त्यांनी खर्डीकर क्लासेसची व्यवस्थापकीय म्हणून काम पाहिले. घरची जबाबदारी सांभाळत सामाजिक क्षेत्रातही त्यांची भरीव कामगिरी होती. क्लासमधील सहकारी शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करायच्या अशी सहकाराची वृत्ती होती. विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून त्यांना ते योग्य मार्गदर्शन करायचे. लोकांशी सुसंवाद साधण्याची कला, मनमिळाऊ स्वभाव, आणि विशेष म्हणजे त्यांचे मोत्यासारखे अक्षर होते. त्यांचे ते सोजवळ आणि निखळ असे व्यक्तिमत्त्व आम्ही गमावले. ते कधीच भरून येणार नाहीत असे खर्डीकर क्लासचे संचालक डॉ.सुनिल खर्डीकर यांनी आमच्या लोकसत्यवाणीच्या संपादकाशी बोलताना म्हणाले.
स्वर्गीय. सौ. मिताली मनिष गावडे यांच्या आठवणी कायम स्मरणात राहण्यासाठी खर्डीकर क्लासेसच्या वतीने कर्तृत्वांचे गुणगौरव स्मृतीपत्र म्हणजेच
गौरवपान त्यांचे पतीराज मनिष गावडे यांच्याकडे देण्यात येणार आहे. तसेच तेराव्या कार्यादिवशी त्यांना मानवंदना म्हणून संपूर्ण खर्डीकर कलासेस बंद ठेवण्यात येतील. त्यांच्या त्या जाण्याने खर्डीकर क्लासची व त्यांच्या कुटुंबातील ही पोकळी कधीच भरून येणार नाही. खर्डीकर क्लासचे सहकारी व परिवारच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली व त्यांच्या त्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
लेखक: संतोष सावंत


0 टिप्पण्या