मित्रानेच केली महागड्या विदेशी पक्ष्यांची चोरी..

 मित्रानेच केली महागड्या विदेशी पक्ष्यांची चोरी..



प्रतिनिधी: अवधुत सावंत


कल्याण - पक्षी विक्रीच्या दुकानातून मित्रानेच सुमारे दोन लाख रुपयांच्यावर महागड्या

विदेशी पक्ष्यांची चोरीसह पंचेचाळीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दुकान मालकाने चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.


कल्याण पश्चिम परिसरातील प्राणी आणि पक्षी विक्रीच्या दुकानातून मित्रानेच महागड्या सुमारे दोन लाख रुपयांच्यावर विदेशी पक्ष्यांची चोरीसह पंचेचाळीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात 'हॅपी पेट्स' दुकान मालकाने चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्राणी व विदेशी पक्षी चोरणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे. शुभम प्रजापती (रा. बेतुरकर पाडा, कल्याण) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.


मित्राने चोरीचा प्रकार केल्याने दुकान मालकाला धक्का..

कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरात राहणारे रवींद्र सहाणे (वय 25) यांच्या मालकीचे कल्याण पश्चिम येथील बेतुरकर पाडा परिसरात एकविरा चाळी शेजारील गाळा नंबर 2 मध्ये प्राणी आणि पक्षी विक्रीचे 'हॅपी पेट्स' नावाचे दुकान आहे. चोरटा शुभम दुकान मालक रवींद्र यांचा मित्र आहे. त्यामुळे तो नेहमी दुकानात येत जात असायचा, त्यातच या दुकानातून मंगळवारी रात्रीच्या सुमारास शिजू जातीचा महागडा कुत्रा, अलबिनो, सन कनूर , व आफ्रीकन जातीचे पोपट, ग्रेटर सल्फर कोकाटो पक्षी, आणि पक्ष्यांचे खाद्य तसेच पंचेचाळीस हजाराची रोकड असा सुमारे दोन लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान मालक रवींद्र सहाणे हे दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन शुभम प्रजापति या मित्रावर संशय व्यक्त करीत त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास करीत त्याला मुद्देमालासह अटक केली आहे. तर मित्रानेच दुकानात चोरी केल्याचे समजल्याने मालकाला धक्काच बसला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या