आजच्या महिलांनी सावित्रीबाईचा आदर्श घेण्याची काळाची गरज ----- नंदिका काळभोर.

  आजच्या महिलांनी सावित्रीबाईचा आदर्श घेण्याची काळाची गरज ----- नंदिका काळभोर.



मुंबई  (प्रतिनिधी)-----+आजच्या महिलांनी सावित्रीबाईचा आदर्श घेऊन काम करणे काळाची गरज असून सावित्रीबाईंनी खूप हालअपेष्टा सहन केल्या आहेत त्या मानाने आजच्या महिलांना काहीच त्रास सहन करावा लागत नाही सावित्रीबाईंनी मुलीसाठी शिक्षणाची दारे खुली केली म्हणून आज आम्ही सर्व क्षेत्रात भरारी मारत असल्याचे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या सुपरवायझर व बाल संरक्षण समितीच्या सचिव नंदिका काळभोर यांनी जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपले विचार मांडले.

      विक्रोळी कांजूरमार्ग एकात्मिक बालविकास प्रकल्प च्या वतीने  वतीने विक्रोळी टागोर नगर येथील निरभवने वाडीत जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला असून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नंदिका काळभोर  यांच्या हस्ते पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यत आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका निशा जाधव  यांनी केले असून   कार्यक्रमावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योती कोकणे व पदाधिकारी यांनी महिलांना  मारक वाटप केले.

    कार्यक्रमाला विभागातील किशोरवयीन मुली महिला पालक सेविका व मदतनीस बहुसंख्येने उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार नंदिका काळभोर यांनी मांडले असून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या