१०५ महिला कन्यारत्न पुरस्काराने सन्मानित

 १०५ महिला कन्यारत्न पुरस्काराने सन्मानित

   जळगाव, अकोला, विरार, डोंबिवलीतील महिलांचा सन्मान 



डोंबिवली (  शंकर जाधव ) कोविड १९ मुळे जागतिक महिला दिनाच्या आनंदावर विरजण पडले असले तरी सामाजिक बांधिलकी उपक्रमात खंड पडू नये या उद्देशाने आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था आणि अक्षरआनंद न्यूज पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने लेक लाडकी अभियान अंतर्गत कन्यारत्न पुरस्कार देऊन १०५ मायलेकींचा सन्मान करण्यात आला.     कोविडमुळे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या उपक्रमात राज्य स्तरीय स्वरूप या उपक्रमाला आल्याचा आनंद आयोजक संस्थेचे अध्यक्ष हेमंत नेहते व डॉ. योगेश जोशी यांनी व्यक्त केला. नेहते म्हणाले की, अकोला, जळगाव, विरार, डोंबिवली, ठाणे आदी भागातून महिलांनी प्रतिसाद दिला, त्यामुळे संस्थेने ५० हून कार्यक्रमात सलग १३ व्या वर्षी उपक्रम करून माता लेकींना गौरवले. आतापर्यंत ५ हजार २८० महिलाना कोणतेही शुल्क कोणाकडून न आकारता गौरवण्यात आले आहे. यंदा संस्थेने राज्यभरातील लीलाधर तळेले ,खेमचंद गणेश पाटील, घनश्याम फिरके, सुरेश सोनवणे, अमोल भागवत पाटील ,राजाराम आळवी, डॉक्टर शुभदा खटावकर, विविध जिल्ह्यातील ७ समन्वयकांना उत्कृष्ट सेवा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यादरम्यान ऑनलाइन पद्धतीनेच महिला दिन सन्मान कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका ज्योती राजन मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. कोविड काळात प्रत्येक महिलेने स्वतःसाठी वेळ काढावा, आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन केले. संस्थेच्या वतीने हेमंत नेहते यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्या म्हणून ठाण्याच्या चिमणी वाचवा, चिमणी जगवा या स्पॅरोताई फाउंडेशनच्या संचालिका ज्योती परब या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी पक्ष्याना वाचवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले. अक्षरआनंद न्यूज पोर्टल वर सगळ्या पुरस्कार मिळालेल्या महिलांचा कौटुंबिक छायाचित्र आणि माहिती प्रकाशित केली, त्याबद्दल अनेक महिलांनी आनंद व्यक्त केला. त्याचे संपादन अक्षरआनंदचे कार्यकारी संपादक डॉ. योगेश जोशी यांनी केले आणि तांत्रिक सहकार्य रोहन जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सुनील खर्डीकर व डॉ. राज परब यांचे मार्गदर्शन लाभले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या