घरगुती वादातून पत्नीची केली हत्या, नंतर स्वतः रेल्वेखाली दिला जीव..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
घरगुती वादातून राग अनावर झाल्याने पतीनेच पत्नीचा चाकूने भोसकून खून केला.
त्यानंतर धावत्या रेल्वेखाली उडी देऊन आपले जीवन संपवल्याचा प्रकार पालघर बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
बोईसर जवळील सरावली त्रिवेदी नगर येथे महेंद्र यादव, त्याची पत्नी माधुरी आपल्या दोन मुलांसह राहत आहेत.
या पती-पत्नीमध्ये रात्री घरगुती वादातून भांडण होऊन मोठा वाद उफाळून आला होता.
या घरगुती वादाच्या रागात महेंद्र याने मध्यरात्रीनंतर पत्नी माधुरीला धारदार चाकूने भोसकून तिचा खून केला, अशी माहिती बोईसर पोलिसांनी दिली.
तिचा खून केल्यानंतर तो तेथून निघून गेला व एका धावत्या रेल्वे गाडीखाली उडी देऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0 टिप्पण्या