मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे भीषण अपघात मात्र सुदैवानं जीवितहानी नाही..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
वाहतूक पोलिसांनी कारवाई कडक केल्यानंतरही मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या तळीरामांची खोड जिरत नसल्याचं दिसून येत आहे. मद्याच्या धुंदीत व मस्तीत बेदरकारपणे गाडी चालवताना हे तळीराम स्वतः चा तर सोडूनच द्या पण इतर निष्पाप लोकांचाही विचार करत नसल्यामुळे कित्येक जीव धोक्यात येतात.
काल सुमारे 22:55 वाजता होंडा एक्सेंट कार एमएच ०५ डीके ७७४० ज्याचे चालक: श्री. सुनील प्रकाश तर्वणकर हे चालवत होते. यांनी मेट्रोच्या बॅरिकेड्स
ला धडक दिली आणि घोडबंदर रोड येथील ठाणे लेनच्या कडेला खाली घसरले. कापूरबावडी, ठाणे (प) येथे विहंग हॉटेलच्या समोर हा अपघात झाला. या गाडीचे मालक श्री. राकेश एकनारक हे आहेत. मात्र चालक सुनील तर्वणकर हे दारू पिऊन नशेत गाडी चालवत होते असे समजते. कापूरबावडी पोलिस अधिकारी, वाहतूक पोलिस अधिकारी, आरडीएमसी आणि अग्निशमन सेतु, आपत्कालीन सामग्रीसह घटनास्थळी हजर झाले. यात कोणालाही जीवितहानी झाली नाहीये तसेच कोणाला इजा झाली नाही असे सांगण्यात आले.
0 टिप्पण्या