अश्लील चित्रफीत बनवून खंडणीची मागणी, दिल्लीच्या तरुणीवर गुन्हा दाखल..

  अश्लील चित्रफीत बनवून खंडणीची मागणी, दिल्लीच्या तरुणीवर गुन्हा दाखल..

a


प्रतिनिधी: अवधुत सावंत


फेसबुक सारख्या सोशल मीडिया वरून तरुणाला नादाला लावून त्याला व्हि.डी.ओ. कॉलवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून त्याची चित्रफीत बनवून त्याच्याकडून खंडणी मागितल्याचा प्रकार नालासोपारा येथे उघडकीस आला आहे. या तरुणाने खंडणी न दिल्याने त्याची चित्रफीत प्रसारित करण्यात आली.या प्रकरणी दिल्ली येथील तरुणीवर तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तरुण २४ वर्षांचा असून तो नालासोपारा येथे राहणारा आहे. त्याची दिल्ली येथील नेहा शर्मा नावाच्या तरुणीशी फेसबुकवर ओळख झाली होती.त्यानंतर दोघे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ या समाजमाध्यमाद्वारे बोलू लागले होते. या वेळी आरोपी नेहाने फिर्यादी तरुणाला व्हि.डी.ओ. कॉलवर अश्लील कृत्य (सेक्स चॅट) करण्यास सांगितले.तिच्या आग्रहामुळे फिर्यादी तरुण तिच्याशी व्हि.डा.ओ. कॉलवर अश्लील कृत्य करत होता.मात्र या चित्रफितीच्या आधारे तरुणीने फिर्यादी तरुणाकडे पाच हजारांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. फिर्यादीने तिच्या धमकीला दाद न दिल्याने आरोपी तरुणीने या चित्रफिती तरुणाच्या मित्रांना पाठवून त्याची बदनामी केली.हा प्रकार समजताच त्याने तुळिंज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आरोपी तरुणी हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या