ह्रदयाची अॅन्जीओप्लास्टी झालेल्या कामगाराला केडीएमसीचा मेमो

 ह्रदयाची अॅ न्जीओप्लास्टी झालेल्या कामगाराला केडीएमसीचा मेमो





कल्याण ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीgबाई रुग्णालयात कामाला असलेल्या कामगार रमेश सोलंकी यांना ह्रदयाचा त्रस झाल्याने त्यांची अॅन्जीओप्लाटी करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी डॉक्टरांनी त्यांना हलक्या स्वरुपाची कामे करावी अशी वैद्यकीय शिफारस केली आहे. या शिफारसीच्या आधारे कामगाराने महापालिका प्रशासनाकडे हलक्या स्वरुपाचे कामाची मागणी केली असता त्यांना प्रशासनाकडून मेमो देण्यात आहे. त्यामुळे महापालिका कामगारांच्या आरोग्याप्रति कितपत गंभीर आहे हेच उघड झाले आहे. 

रमेश सोलंकी यांना ह्रदयाचा त्रस सुरु झाल्यावर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. त्यांना डॉक्टराने अॅन्जीओप्लासी करण्यास सांगितले. त्यांच्या अॅन्जीओप्लासीच्या वैद्यकीय अहवालापाश्चात खाजगी डॉक्टरांनी त्यांना आत्ता जड स्वरुपाची कामे न करता हलक्या स्वरुपाची कामे करावी असा वैद्यकीय सल्ला लेखी स्वरुपात दिला. या सल्ल्याच्या आधारे सोलंकी यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्य मुख्य वैद्यकीय अधिका:यांकडे अर्ज करुन त्यांना असलेल्या त्रस आणि वैद्यकीय कागदपत्रे सादर करीत त्यांना रुक्मीणीबाई रुग्णालयातील अपघात विभागात सकाळच्या सत्रत हलक्या स्वरुपाचे काम द्यावे अशी मागणी केली. आरोग्य विभागाने त्यांच्या अर्जाचा सहानूभूतीपूर्वक विचार न करता त्यांना मेमो बजावला आहे. या मेमोने रमेश सोलंकी व्यथित झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीचे काय होणार अशी चिंता त्यांना सतावित आहे.

दरम्यान सोलंकी यांना बजावण्यात आलेल्या मेमो प्रकरणी वैद्यकीय अधिकारी पुरषोत्तम टिके यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या अपघात विभागात चारच कर्मचारी आहे. कर्मचा:यांची कमरतता आहे. एखाद्या कर्मचा:याला सकाळच्या सत्रत डय़ूटी बदलून दिल्यास ते असमानतेचे होईल. तब्येतची काळजी घेऊनच डॉक्टरांच्या फीटनेस प्रमाणपत्रनंतर कामगाराने कामावर हजर झाले पाहिजे. रुग्णालयातील रुटीन कामे हजर झाल्यावर करावीच लागतील. जड काम देणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या