लग्न वरातीत सोशल डिस्टन्ससिंगचा फज्जा
डोंबिवली ( शंकर जाधव ) एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला असताना दुसरीकडे मात्र डोंबिवली पूर्वेकडील प्रसिद्ध असलेल्या फडके रस्त्यावर एका लग्नाच्या मिरवणुकीत सोशल डिस्टन्ससिंगचा फज्जा उडाल्याचे पाहवयास मिळाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन करत लॉकडाऊन नको असेल तर नियमांचे पालन करा असे सांगितले होते. मात्र डोंबिवलीतील या वरातीने कोरोना चे आम्हाला भय नाही या आविर्भावात सर्व नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले. या वरातिने पालिका प्रशासनाला एकप्रकारे आव्हान केल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा वरतीवर प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून का कारवाई होत नाही असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे. सुरुवातीला देखील एका लग्नाच्या हळदीमध्ये डोंबिवली शहरात कोरोनाचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता.त्यामुळे आता तरी प्रशासन जागे होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
0 टिप्पण्या