मराठी बोली भाषेतील सौ.सुरेखा गावंडे,कल्याण यांची 'सपान' ही कविता विजेती ठरली.

 मराठी बोली भाषेतील सौ.सुरेखा गावंडे,कल्याण यांची 'सपान' ही कविता विजेती ठरली.



कवयित्री,लेखिका सौ.सुरेखा गावंडे यांना प्रमाणपत्र देऊन

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई,दादर सार्वजनिक वाचनालय,मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने

शनिवार ,दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता धुरु हाॕल दादर (प) येथे ठराविक ५० लोकांच्या उपस्थितीत मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.खासदार राहुल शेवाळे साहेब ,मा.ज्ञानेश महाराव संपादक चित्रलेखा,श्रीमती शिला साईल ( सहाय्यक पोलीस आयुक्त) सरसंपादक,दक्षता मासिक तसेच संघाचे अध्यक्ष रविन्द्र मालुसरे, श्रीमती शुभा कामथे,अॕड.देवदत्त लाड यांच्या उपस्थितीने  कार्यक्रम अप्रतिम असा झाला.

मराठी बोली भाषेतील सौ.सुरेखा गावंडे,कल्याण यांची *सपान* ही कविता विजेती ठरली.तसेच *माझ्या मराठीची बोलू कौतुके* हा त्यांचा लेख ही यशस्वी ठरला.मा.खासदार राहुल शेवाळे सर आणि सहाय्यक पोलिस आयुक्त मा.साईल मॕडम यांच्या हस्ते कवयित्री,लेखिका सौ.सुरेखा गावंडे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात जेष्ठ वृत्तपत्र लेखक श्री प्रकाश नागणे आणि श्री चंद्रकांत पाटणकर यांना *जीवन गौरव*सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  संघाचे पदाधिकारी श्री प्रशांत घाडीगांवकर,श्री रमेश सांगळे,श्री आत्माराम गायकवाड,श्री मनोहर साळवी,श्री नितीन कदम तसेच सर्व कार्यकर्ते यांच्या मेहनतीने कार्यक्रम उत्तररित्या यशस्वीपणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या