मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा _ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा _ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



(प्रतिनिधी: अवधुत सावंत)

मुंबई :-कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले असून जिथे जिथे आवश्यकता  असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश यांनी दिले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. “राज्यात लॉकडाऊन करायचा का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. याचं उत्तर आठ दिवसांत मिळेल. आठ दिवस मी बघणार. ज्यांना लॉकडाऊन नको, ते मास्क घालणं, हात धुणं, अंतर ठेवणं अशा गोष्टी पाळतील. बघूया किती जणांना लॉकडऊन हवा आणि किती जणांना नको आहे ते” असेही ते म्हणाले. यावेळी ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली.


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील मुद्दे मांडले…


कोरोनाचा देशात शिरकाव झाला तेव्हा परिस्थिती कशी हाताळावी याची कोणालाच कल्पना नव्हती. औषध तेव्हा ही नव्हतं आजही नाहीए. एक दिलासादायक बातमी म्हणजे आता वॅक्सीन आलंय. व्हॅक्सिनेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ९ लाख फ्रंटलाईन वर्कर्स किंवा कोविड योद्ध्यांना लस देण्यास सुरुवात केलीए. सुरुवातीला एक गैरसमज होता की वॅक्सिनने काही साईड इफेक्ट्स होतात का? पण सुमारे ९ लाख कोविड योद्ध्यांना लस दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचे घातक साईड इफेक्ट्स आढळून आले नाहीत. मी जे राहिलेले कोविड योद्धे आहेत त्यांना विनंती करतो की कोणतेही किंतु-परंतु ना ठेवता बेधडक लसीकरण करून घ्या.


पुढील एक ते दोन महिन्यात काही कंपन्या आपल्याला लसी देणार आहेत. त्यांचं उत्पादन हळूहळू सुरू होतंय, ट्रायल-चाचण्या सुरू आहेत. जसजसा ते त्यांचा कार्यकाळ व कार्यक्रम पूर्ण करतील तशा आपल्याला लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि तेव्हा जनतेसाठी आपण हा कार्यक्रम खुला करून देऊ. लस घेण्यापूर्वी व नंतरही आपण मास्क घालायला हवा. हे एक युद्धच आहे, वॉर अगेन्स्ट व्हायरस. अजून आपल्या हातात तलवार नाही. व्हॅस्किन धीम्या गतीने येतयं. पण मास्क हीच ढाल आहे. ही ढाल काढली किंवा घालायला विसरलो, तर हा छुपा शत्रू आहेच. काही वेळेला तो आप्तस्वकीयांच्या माध्यमातून वार करतो.


म्हणून आपल्याला विनंती आहे, की मास्क घालणं अनिवार्य आहे. लस घेण्याआधी व नंतरही. लग्न-समारंभात उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध आहेत. हॉटेल्स, दुकानं, रेस्तराँच्या वेळा वाढवल्या, लोकल्स सुरू केल्या, मंदिरं उघडली. त्या काळात आपण सूचनांचं तंतोतंत पालन केलं. आताही आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. पण आता झालं काय तर करोना गेला असं वाटायला लागलं. पाश्चिमात्य देशांत असंच झालं. सुरुवातीलाच सांगितलं, की लाट येते, मग खाली जाते, परत वर येते. ती खाली जाते तेव्हाच थांबवायचं. आपण अलीकडे जी शिथिलता अनुभवली ती पाश्चिमात्य देशांतही होती. पण तिकडे अनेक देशांत लॉकडाऊन करावा लागला.


कोणी काहीही म्हणो. संसर्गाची साखळी तोडायची असेल, तर संपर्क तोडणे हाच माहीत असलेला मोठा उपाय आहे. पंधरा दिवसांपूर्वी करोना गया, कुछ नही अभी असं वातावरण होतं. तेव्हा दोन-अडीच हजार रुग्ण येत होते. खरंच चांगलं वातावरण होतं. पण ते सगळं तुमचं कर्तुत्व होतं आणि योद्ध्यांची अविरत मेहनत. त्यांनी अहोरात्र काम केलं. कित्येकांनी जीवही गमावले. त्यांनी जे बलिदान केलं, जे शहीद झाले त्यांच्या मेहनतीवर आपण पाणी टाकायला नको. कोविड  योद्ध्यांचा सगळीकडे सत्कार सुरू आहे. आनंद आहे. पण सत्कार करताना किमान एक भावना अशी हवी की, आणखी कोविड योद्धे निर्माण करण्याची गरज लागायला नको. आपण कोविड योद्धे नाही झालात, तरी कृपा करून दूत होऊ नका. एकीकडे कोविड योद्ध्यांचा सत्कार करायचा आणि दुसरीकडे हे उघडा ते उघडा म्हणायचं, असं नको. सामाजिक भान ठेवा. हे युद्ध जिंकण्यासाठी आपण जे करता येईल ते करायला हवं.


आधी दोन- अडीच हजार रूग्ण असायचे. त्यात आता तेवढीच भर पडायला लागली आहे. हे फार विचित्र आहे. आज अमरावतीमधे हजाराच्या आसपास रूग्ण आहेत. तेव्हाच्या प्रमाणात किंवा त्याच्या जवळपास आता रुग्ण सापडत आहेत. आज गलथानपणा केला, तर आकडेवारी किती वाढेल, याची मला चिंता आहे. आधी रुग्ण आणि आरोग्य सुविधांचं प्रमाण विषम होतं. पण तेव्हाचा जो पिक होता, जे सर्वोच्च शिखर होतं, तिथपासून आता सुरुवात झाली तर आरोग्यव्यवस्थेवर किती ताण येईल. मंत्रिमंडळातले आमचे सहकारीही बाधित होत आहेत. राजेश टोपे, जयंत पाटील बाधित आहेत. सुदैवाने यशोमती ताई निगेटिव्ह आल्या.


दोन अडीच हजारांवरून आज महाराष्ट्रात ६९७१ रुग्णसंख्या झाली आहे. मुंबईत जी संख्या ४०० च्या आसपास होती, ती आता ८००-९०० वर गेली आहे. पुण्यातही तीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती म्हणजे तर दुसरी लाट आली आहे का? ती दारावर धडका मारतेय. आली की नाही हे पंधरा दिवसांत कळेल. उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक मिरवणूका, मोर्चे, आंदोलनं- गर्दी होणारी आणि मोठ्या यात्रा यावर पुन्हा काही दिवसांची बंदी घातली जाईल, कृपया याची नोंद घ्यावी.


माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवली, तेव्हा आपण घरात होतात. आता ही मोहीम पुन्हा करायची झाली, तर ते अवघड आहे. आता सगळे घराबाहेर आहेत. अशा वेळेस मग या यंत्रणेवर किती ताण द्यायचा. एकाच यंत्रणेवर ताण टाकून आपण बेभान वागायचं हा अमानुषपणा आहे. मला असं वाटतं, की माझे कुटुंब जशी मोहीम राबवली आणि यशस्वी केली, तशी आता नवी मोहीम सुरू करायला हवी, की – मी जबाबदार. प्रत्येकानं मास्क घालायाचा, हात धुवायचे, सगळे सॅनिटाययझर विसरायला लागले आहेत. ते वापरायचं, अंतर ठेवायचं.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढे म्हणाले की गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारे मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, मॉल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते म्हणाले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित केले..


आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येतो तर आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ देऊ नका. गेले वर्षभरापासून आपण कोरोनाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय , त्यात आपल्याला यशही आले आहे. कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असताना पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून मागील काही दिवसांत मुंबईत दिवसाला ३०० ते ४०० रुग्ण संख्येपर्यंत खाली उतरलो होतो मात्र आता काही दिवसांपासून ८०० ते ९०० रुग्ण आढळत आहेत. कल्याण डोंबिवलीत ही दोन दिवसात सुमारे ४०० रुग्ण आढळून आले व ७ जणांचा मृत्यू झाला अशी नोंद आहे व राज्यातही दररोज हजार ते दीड हजार रुग्ण वाढत आहे व दिवसभरात सुमारे ७ हजार रुग्ण आढळले ही चिंताजनक बाब आहे. सामाजिक जबाबदारी ठेऊन वागणे महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा विवाहाचा स्वागत सोहळा रद्द करून भान ठेवले यासाठी डॉ. नितीन राऊत यांचे अभिनंदन केले. व लोकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखावी असे आवाहन केले.


पाश्चिमात्य देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्याठिकाणी मोठे निर्बंध टाकण्यात आले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की सर्व काही खुले करा म्हणून नियम मोडून आंदोलने करणारे आता जेव्हा संसर्ग वाढत आहे आता पुन्हा सरकारवर टीका करीत आहे कोरोनाचे कुणीही राजकारण करू नये “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहीम यशस्वी झाली, आपण संसर्गाला रोखले सुद्धा पण त्यावेळी बहुतेक सर्व जण आपापल्या घरांत होते. आता आपण सर्व काही खुले केले आहे, आपण सर्व बाहेर आलो आहोत त्यामुळे मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझर ने हात सतत धूत राहणे ही आपली व्यक्तिगत जबाबदारी असून ती सर्वानी पार पाडण्यासाठी ” मी जबाबदार” ही मोहीम सुरु करीत आहोत असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले कोविडची जोरदार साथ असताना देखील महाराष्ट्र थांबला नाही. २ लाख कोटींपर्यंत गुंतवणूक महाराष्ट्राने आणली व यापुढेही महाराष्ट्र थांबणार नाही. प्रधानमंत्री समवेत नीती आयोगाच्या बैठकीत आपण कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत धोरण असावे अशी मागणी केली आहे असे मुख्यमंत्री यांनी शेवटी सांगि

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या