भाजपा पदाधिकाऱ्याच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट

 भाजपा पदाधिकाऱ्याच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट


डोंबिवली  ( शंकर जाधव )  येथील भाजपचे पदाधिकारी दत्ता माळेकर यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट बनवून मेसेंजरद्वारे त्याच्या मित्रांकडे पैसे मागितले जात आहे. याची माहिती मिळताच माळेकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत अर्ज केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.भाजपाच्या वाहतूक सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर हे कल्याण-शीळ मार्गावरील सोनारपाडय़ातल्या सोळंकी भवनात कुटुंबियांसह राहतात. माळेकर हे कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा आणि वाहनचालकांच्या समस्या सोडवित असतात.माळेकर यांच्या नावाने अनोळखी व्यक्तींने फेसबुक अकाऊंट तयार केले. सदर व्यक्तीने माळेकर यांच्या काही मित्रंकडे फेसबुकच्या मेसेंजरद्वारे कुणाकडे पाच हजार रुपये तर कुणाकडे दहा हजार रुपये अशी पैशांची मागणी केली आहे. सध्या मी रुग्णालयात आहेमला पैशांची गरज आहेअसे लिहून अनेकांकडे पैशांची मागणी केली आहे. पैशांची मागणी करणाऱ्या अनोळखी व्यक्तीने माळेकर यांचा मित्र अजय पाटील यांच्यासह अनेक मित्रांना मेसेज केले होते. माळेकर यांना अजय पाटील यांच्याकडूनच हा प्रकार समजला तेव्हा त्यांना धक्का बसला. अनोळखी व्यक्तींनी फोन व बॅक अकाऊंट नंबर देखील दिले आहेत. सदर व्यक्तींच्या फोन नंबरची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता हा नंबर फाईन या नावाने असल्याचे दिसून आले आहे. तीन लष्करी अधिकारी आणि एक इसम चर्चा सुरू असल्याचा फोटो त्या नंबरवर प्रोफाईलवर ठेवला असल्याचे दिसून येत आहे. आपल्या मित्रांची आर्थिक फसवणूक होऊ नये याकरिता माळेकर यांनी पोलिसांकडे काही पुराव्यासह लेखी तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात दिली आहे
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या