आता नागपुरात बंद!-नागपूरमध्ये शनिवार-रविवार बाजारपेठा बंद; तर शाळा, महाविद्यालये 7 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश; लवकरच अधिकृत घोषणा
पालकमंत्र्यांच्या बैठकीत झाला निर्णय
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जिल्हास्तरावर कठोर पावले उचलली जात आहेत. अमरावती आणि पुण्यासह अकोल्याने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता निर्बंधांची घोषणा केलीच होती, त्यात आता नागपूरची भर पडली आहे. नागपुरात शनिवार, रविवार असे आठवड्यातील दोन दिवस बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राउत यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच यासंदर्भात अधिकृत माहिती जारी केली जाणार आहे.
बैठकीत झालेले निर्णय
- मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 'मी जबाबदार' मोहिम नागपुरात राबविली जाणार
- हॉटेल, रेस्तरला 50 टक्के क्षमतेपर्यंत परवानगी असेल, पण रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ते बंद असतील
- कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करणार, चाचण्यांचे प्रमाण वाढवले जाणार
- मंगल कार्यालये, लॉन, रिसॉर्ट यांना 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना
- धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम 7 मार्चपर्यंत बंद राहतील
- नागरिकांनी कुठलेही लक्षण आढळल्यास चाचणी करावी असे आवाहन


0 टिप्पण्या