हरितालिका व्रत भक्तिभावाने संपन्न
पनवेल दि. २१: खांदा कॉलनी, नवीन पनवेल परिसरामधे हरितालितालिकेचे व्रत भक्तिभावाने संपन्न झाले. अखंड सुखसौभाग्यासाठी सुवासिनींनी आणि मनाजोगता पती मिळावा अशी कामना करून कुमारिकानीही सखीपार्वतीचे पूजन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी एकत्र न येता सुयोग्य अंतर ठेवून महिलांनी हरितालिका पूजन केले. तसेच बऱ्याच महिलांनी यंदा स्वतःच्याच घरात हरितालिकेच्या मूर्ती आणून पूजा करणे पसंत केले.
पूजासाहित्य व वाणाच्या वस्तू, तसेच फुलसाहित्य आदींच्या खरेदीसाठी पनवेल बाजारपेठेमधे मोठया प्रमाणावर गर्दी झालेली दिसून येत होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडालेला दिसून आला. सर्वच वस्तूंचे भाव वाढल्याने भाविकाना महागाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळाले.
श्रीनिवास काजरेकर

0 टिप्पण्या