एक वही एक पेन बाप्पाच्या चरणी अभियान
तिरंगा जागृती विचार मंच आणि टीम परिवर्तनचा एकत्रित उपक्रम(कल्याण प्रतिनिधी )
गणपती उत्सव म्हणजे आनंदाचा आणि जल्लोषाचा परिपूर्ण आस्वाद याच गणपती उत्सवात आपल्याला विविध सामाजिक उपक्रम, पर्यावरणपुरक मुर्त्या, सजावटी पहावयास मिळतात असाच एक उपक्रम कल्याण शहरात तिरंगा जागृती विचार मंच आणि टीम परिवर्तनच्या माध्यमाने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गणपती उत्सवात होत असतो. बाप्पाच्या चरणी एक वही आणि एक पेन अर्पण करावे आणि जमलेले साहित्य गरीब गरजु विद्यार्थ्यांना मदत म्हणुन द्यावे यासाठी या दोन सामाजिक संस्था दरवर्षी हा उपक्रम राबवत आहेत यावर्षीदेखील बाप्पाच्या चरणी एक वही आणि एक पेन अर्पण करण्याचे आवाहन नागरिकांना संस्थेच्यावतीने करण्यात आले होते. तिरंगा जागृती विचार मंचच्या वतीने चेतन म्हामुणकर जमलेले साहित्य टीम परिवर्तनाकडे सुपूर्द करतात आणि जमलेल्या साहित्यातून गरीब आणि गरजु विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. घरोघरी जाऊन तिरंगा जागृती विचार मंचच्या वतीने एक वही आणि एक पेन बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात येते आणि पुन्हा हे साहित्य वाटपासाठी एकत्र जमा केले जाते गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम यावर्षीही जोमाने चालू आहे जमलेल्या साहित्याची विभागणी करून जवळपासच्या आदिवासी पाड्यातील गरजु विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती चेतन म्हामुणकर यांनी यावेळी दिली. घरोघरी गणपती उत्सव साजरा करताना बाप्पाच्या चरणी अशाच प्रकारे शैक्षणिक साहित्य अर्पण केल्यास नक्कीच या साहित्याचा फायदा गरजु विद्यार्थ्यांना होईल यासाठी सर्वांनी आपल्या घरी बाप्पाच्या चरणी साहित्य जमा करावे आणि ते गरीब विद्यार्थ्यांना मदत म्हणून द्यावे असे टीम परिवर्तनचे अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितले. उपक्रमात भुषण राजेशिर्के साहित्य संकलनाचे काम करत आहेत.



0 टिप्पण्या