कविता- माणसे

 माणसे


जिवाला जीव देणारी माणसे गेली कुठे 

होती माणसांत ती माणसे गेली कुठे ||धृ||


ठेंस लागली दुसऱ्यास कळवळत होते  मन 

जख्मा चिघळून गेल्या इवळनारी माणसे गेली कुठे ||१||


चहूकडे पसरला हा वनवा द्वेषाचा 

मायेचा झरा  पाझरनारी माणसे गेली कुठे ||२||


हाय ह्या दुःखी अरण्यात साद घालूतरी  कुणा 

हांकेला हाक देणारी माणसे गेली कुठे ||३||


ना राहिले प्रेम नरेशा ना राहिला जिव्हाळा

कळ्या कळ्या सम गुंफलेली माणसे गेली कुठे ||४||


     - कवी नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)



मो ७५१७३८९८४६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या