सिंधुदुर्गातील नरडवे गावचा शेतकरी,वसईत शेती करी

सिंधुदुर्गातील नरडवे गावचा शेतकरी,वसईत शेती करी

आम्ही आज एका व्यक्तीची, ओळ्ख करून देणार आहोत, नुसती नोकरी करत न बसता त्यांनी शेतीलाही प्राधान्य दिले आहे, ती व्यक्ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे भेर्देवाडी
हे त्यांचे मूळ गाव एक शेतकरी कुटुंबात जन्मलेले, गरीब परिस्थितीत वाढलेले येथील सुपुत्र पुतळाजी कदम, यांनी 1995 साली नोकरी निमित्ताने मुंबईत आले त्यानंतर काही अल्पावधीतच त्यांनी वसई येथे राहण्यास सुरुवात केली नोकरीधंदा सांभाळत आपलं व आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत स्वतःची उपजिविका त्याचबरोबर समाजाची सेवा करायची आवड असल्यामुळे सामाजिक क्षेत्रातही ते काम करत आहेत. त्यात स्वतःचे कुटुंबातील मुलं पत्नी आई भावंडे मुले-मुली यांचा संभाळ करण्याची  जबाबदारी त्यांच्यावरच होती.
        आपले गाव सोडून जरी मुंबईत नोकरी निमित्ताने आले असले तरी त्यांचं शेतकरी हा पेक्षा काही त्यांनी सोडलेला नाही.   शेतकर्‍यांचे रक्त नसानसात कसे भरलेले असते हे त्यांनी दाखवून दिले.  मुंबईत आल्यानंतर काही दिवसांनी वसईला आले.  तेथे सध्या वसई येथे एका डोंगरावरच्या भागातली जमीन सपाट करून तेथे त्यांनी कोपरे बनविले  व त्या जमिनीत आज भात शेती भाजीपाला यांसारखी सध्या ते पीक घेत आहेत.  याकामी त्यांच्या आईचे मोठे सहकार्य मिळाले. मजूर घालून डोगराळ जमीन सपाट करून घेतली, त्यावेळी आई देखरेख करायची.
      आज त्या जमिनीवर  भात शेती आणि फळभाज्या मळा फुलतो आहे,  आंबे फणस, व काजूची ही झाडे लावून त्यांनी सुंदर नंदनवन फुलवले आहे.
      पुतलाजी हे गणपती आणि होळीला न चुकता आवर्जून गावी जात असतात व इतर काही ते आपल्या गावाकडील सण न चुकता करत असतात. आशा ह्या कोकणातल्या नरडवे गावच्या सुपुत्राने वसई मध्ये फुलविलेला भातशेती आणि भाजीपालाचा मळा. सांगायचे एवढवच की जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर मनुष्याला अवघड काहीही नसतं हेच यातून शिकायला मिळते.
       संतोष सावंत✍️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या