लोकसत्यवाणी स्पेशल रिपोर्ट..
बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेकडून महानगरपालिकेच्या शाळा व खाजगी शाळांच्या इमारतींमध्ये कोविड-19 च्या संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारण्याची तयारी सुरू आहे. या कामात मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक व कर्मचारी यांच्यासोबतच खाजगी शाळांतील शिक्षक व कर्मचारी यांना सदर कामात मदत करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाकडून ऑनलाइन माहिती मागवण्यात आली आहे. तशा आशयाचा आदेशच शिक्षणाधिकारी मा.श्री. महेश पालकर साहेब यांनी दि.२३ एप्रिल २०२० रोजी जारी केला आहे.
अशा कठीण परिस्थितीत शासनाला व मनपा प्रशासनाला मदत करणे ही आमची नैतिक जबाबदारीच आहे.असे आम्ही मानतो.
परंतु याबाबतीत विचार केला तर खाजगी शाळांतील शिक्षक व कर्मचारी यांची नेमणूक ही शाळा व्यवस्थापन करते, त्यामुळे सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणणे आवश्यक अआहे. दुसरे म्हणजे या शिक्षक व कर्मचारी यांना विलगीकरण कक्षातील कामगिरीबाबतचे कोणतेही आवश्यक प्रशिक्षण मनपा प्रशासनाकडून दिले गेलेले नाही, तसेच वर्गात अध्ययन-अध्यापन करताना शिक्षकांचा थेट संबंध हा ६ ते ९ वर्षाच्या मुलांशी व अप्रत्यक्षरित्या त्यांच्या पालकांशीही येत असतो . त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. शिवाय कामगिरीच्या कालावधीत शिक्षक व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्वाचा आहे.
असे अनेक प्रश्न शिक्षक व कर्मचारी यांच्याकडून येत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींची जबाबदारी कोण घेणार? मुंबई महानगरपालिका घेणार की खाजगी शाळांचे व्यवस्थापन?
असा मोठा चिंता वाढवणारा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच याबाबतीत कोणतेही स्पष्ट निर्देश मिळत नसल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खाजगी शाळांतील सुमारे ४००० शिक्षक व कर्मचारी यांची चिंता वाढली आहे.
याबाबत अनेक शिक्षक व कर्मचारी यांनी जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना या खाजगी शाळांच्या संघटनेकडे मोबाईलद्वारे संपर्क साधला व सदर बाबी लक्षात आणून दिल्या आहेत.
तरी सदर विलगीकरण कक्षाच्या कामगिरीतून खाजगी शाळांतील शिक्षक व कर्मचारी यांना वगळण्यात यावे अशी मागणी शिक्षक व कर्मचारी यांच्याकडून जोर धरू लागली आहे. त्यामुळे सदर मागणीचा विचार करून तशा आशयाचे निवेदन संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. विजय पाटील यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. प्रविणसिंह परदेशी साहेब यांना देऊन समस्त शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने विनंती केली आहे.
(इथे पत्र दाखवा)
अशी माहिती आम्हाला संघटनेचे सरचिटणीस श्री. संदीप परब यांनी दिली आहे.
याबाबतीत आमच्या प्रतिनिधींनी संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष श्री. विजय पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
पाहुया ते याबाबत काय म्हणाले ते...
0 टिप्पण्या